स्वागत नविन वर्षाचे
आज 31डिसेंबर 2020 इंग्रजी महिन्या प्रमाणे या वर्षाचा शेवटचा दिवस संपतोच आहे. उदयाला नवीन वर्षाची म्हणजेच 2021 या वर्षाची सुरुवात होईल, आपण सर्वजण या वर्षाचे मोठ्या उत्साहाने स्वागत करूया... 2020 हे वर्ष प्रत्येकाच् कायम स्मरणात राहील. हे वर्ष कोरोनाचे वर्ष होते. या कोरोनाने प्रत्येकाला जगायला,वागायला,रहायला,बोलायला,चालायला,व्यवहार करायला,चांगले शिकवले. कोरोणाने प्रत्येकाला एक चांगला धडा दिला की, आयुष्य जगत असताना या जगतात माणूस हा पराधीन आहे."पराधीन आहे पुत्र मानवाचा " या उक्ती प्रमाणे तो परावलंबी आहे.तो निसर्गावर अवलंबून आहे.तो कितीही शिकला,सवरला तरी तो निसर्गावर मात करू शकत नाही. निसर्ग आपला गुरू आहे हे शिकला.माणूस पृथ्वीवरून चंद्रावर गेला,समुद्रावर गेला,तरी तो निसर्गावर मात करून पुढे जाऊ शकत नाही. यातून एक गोष्ट शिकली पाहिजे की,प्रत्येक माणसाने प्रत्येक माणसाची माणसा प्रमाणेच वागले पाहिजे,बोलले पाहिजे,चालेल पाहिजे,माणूस सर्व काही निर्माण करू शकतो परंतु निसर्गातील गोष्टी तो स्वतः निर्माण करू शकणार नाही.आकाश ढग, सूर्य,चंद्र,तारे,...