Blog म्हणजे काय

 1-Blog म्हणजे काय आहे..? 

2-Blog तयार करायला कोण-कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते...? 

3-Blog कसा तयार करावा (How to create Blog and meaning of Blog in marathi)

4-Blogger वर फ्री Blog कसा तयार करावा.

            

    नमस्कार  मित्रांनो ! 

मराठी Blog शक्ति मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज या पहिल्या लेखामध्ये आपण शिकणार आहोत की 

* Blog meaning in marathi आणि Blog कसा तयार करावा.

आपण आज मराठी मध्ये Blog तयार करायला शिकणार आहोत.



Blog कसा तयार करावा..? 


मित्रांनो

तुम्हाला तर कदाचित माहीतच असेल की यापूर्वी Google Adsense मध्ये मराठी Blog ला मान्यता नव्हती.

त्यामुळे कित्येक मराठी भाषिकांना Blog बनवायला व त्या द्वारे पैसे कमवायला अडचणी येत होत्या परंतु मराठी भाषिकांची गूगल वर मराठीतून माहिती मिळवण्याची वाढती गरज लक्षात घेऊन गूगल ने 2020 मध्ये मराठी Blog ला Adsense मध्ये मान्यता दिली.🤗


ही गोष्ट आपल्या मराठी  लोकांसाठी व मराठी bloggers साठी खूपच आनंदाची आहे. आता कोणीही मराठीतून Blog लिहून पैसे कमावू शकतो.😎

  चला तर मग शिकूया Blog कसा तयार करावा आणि Blogspot Blog कसा तयार करावा मराठी मध्ये.


Blog म्हणजे काय आहे...? 


-----मित्रांनो मी अगोदर तुम्हाला Blog काय असतो या बद्दल थोडी माहिती देतो म्हणजे तुम्हाला Blog बनवताना कुठलिहि अडचण येणार नाही.


Blog एक प्रकारची वेबसाईट च असते ज्यामध्ये आपण

 माहिती, ज्ञान, मनोरंजनाच्या गोष्टी जसे की ऑडियो गाणी व्हिडिओ गाणी, फोटो, सिनेमा इत्यादी लोकांपर्यंत पोहचवु शकतो व तसेच आपले अनुभव लोकांसोबत शेअर करू शकतो.. 


Blog अनुभव सांगण्याचा व लोकांपर्यंत माहिती व ज्ञान पोहचवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. ज्याप्रमाणे आपण निबंध लिहितो त्याचसारखे लेख आपल्याला लिहून Blog मध्ये publish करायचे असतात.



*Blog तयार करायला कोण-कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते?

मित्रांनो आपण जर Blogging क्षेत्रात नवीन असाल तर आपल्याला नक्कीच प्रश्न पडला असेल की Blog तयार करायला  कोण कोणत्या गोष्टींची आवश्यकता पडेल...?

काहीजण तर विचार करत असतील Blog बनवन म्हणजे खुप अवघड काम आहे. त्यासाठी आपल्याला html, css, javascript सारख्या कॉम्पुटर प्रोग्रामिंग भाषा येण्याची आवश्यकता असेल.


परंतु असं मुळीच नाही Blog कुणीही बनवू शकतो,

Blog बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारची शैक्षणिक पात्रतेची अट नाही किंवा coding येण्याची देखील गरज नाही. आपल्याला जर खरच आवड असेल लेख लिहिण्याची तर आपण देखील Blogging करू शकता. आपले विचार जगभरातील लेकांपर्यंत प्रभावीपणे पोहचवू शकता. एवढच नव्हे तर आपण आपल्या Blog वर Google च्या जाहिराती लाऊन लाखों रुपये देखील कमावू शकता.


आपण जर मराठी भाषेमध्ये Blog बनवण्याचा विचार करत असाल तर आपल्या साठी सुवर्ण संधी आहे.कारण येवढे वर्ष Google Adsense वर मराठी Blog ला मान्यता नव्हती आता 2020 मध्ये मान्यता मिळाली आहे त्यामुळे अगदी मोजकेच मराठी Blogger गूगल वर उपलब्ध आहेत. 


ब्लॉग बनवायला लागणाऱ्या गोष्टी:

1-Domain name

2-Hosting

3-लॅपटॉप / मोबाईल

मिञांनो Blog बनवायला तुम्हाला या तीन च गोष्टींची आवश्यकता पडेल. सर्वात पहिली म्हणजे domain name म्हणजे .com , .net , .in सारखे domain extension सोबत असलेलं ब्लॉग चा address.

त्यानंतर आपल्याला आवश्यकता असेल hosting ची आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक android mobile किवा लॅपटॉप ची ज्याद्वारे आपण लेख लिहिणार.


टीप: आपण जर आपला Blog blogger.com वर बनवत असाल तर आपल्याला domain आणि hosting साठी पैसे खर्च करण्याची गरज नाहीं. आपल्याला Blogger कडून फ्री blogspot domain आणि free hosting मिळते व आपण फ्री मराठी ब्लॉग बनवू शकता.


कारण Blogger हे एक Google च उत्पादन आहे त्यामुळे Blogger कडून आपल्याला फ्री मध्ये blogspot domain आणि hosting मिळते. तर चला मग शिकूया blog कसा तयार करावा, blogspot blog कसा तयार करावा, free blog कसा तयार करावा.


मित्रांनो मी आपल्याला फ्री Blog कसा तयार करावा याबद्दल सविस्तर step by step माहिती देतो आपल्याला फक्त त्या स्टेप च लक्ष्य देऊन अनुसरण करायचं आहे. आपण देखील अगदी सहज Blog बनवू शकाल. 


Step 1 : आपल्याला google वर जाऊन blogger टाईप करून सर्च करायचं आहे. 


Step 2: Google आपल्याला blogger संबंधित अनेक परिणाम दाखवेल आपल्याला त्यातील blogger च्या ऑफिशियल  वेबसाईट blogger.com ला भेट द्यायची आहे.


Step 3: त्यानंतर जर आपल blogger वर अकाउंट नसेल तर email id ने blogger वर log in करायचं आहे.


Step 4: नंतर आपल्या ला create a new blog वर क्लिक करायचं आहे.

 


Step 5: आता तुमच्या समोर तीन ऑप्शन येतील title, address आणि theme यामध्ये आपल्याला आवश्यक माहिती भरायची आहे.

 


Title: Title हे तुमच्या Blog च नाव असेल. आता तुम्हाला तुमच्या Blog च नाव ठेवायचं आहे. नाव ठेवताना थोडा विचार करूनच ठेवा. कारण आपल्या Blog च नाव जर attractive असेल तर त्याला जास्तीत जास्त लोक भेट देतील. त्यामुळे Blog च नाव attractive कस ठेवता येईल याचा विचार करा.


Address: यानंतर आता आपल्याला blog address लिहायचा आहे. जे Blog च नाव आहे त्यावरूनच blog address देखील ठेवा. जसे या माझ्या  Blog च नाव आहे मराठी  शक्ति आणि blog चा address आहे marathishakti.blogspot.com. याप्रमाणे तुम्हाला पण तुमच्या Blog चा address ठरवायचा आहे.


जर आपण टाईप केलेला blog address जर अगोदरच कुणी वापरत असेल तर तिथे this blog address is not available असं लिहून येईल. अशी सूचना आल्यानंतर तुम्हाला Blog च्या address मध्ये काही बदल करावे लागतील. Blog चा address लिहिल्यानंतर जर this blog address is available अशी सूचना लिहून आली तर मग आपण हा address आपल्या Blog ला ठेऊ शकतो.


Blog address थोडा सोपा ठेवा जेणे करून वाचकांना लक्षात ठेवायला अडचण नाही येणार आणि हाच blog address तुमच्या Blog चा url असेल. 


Theme: आता तुम्हाला तुमच्या blog साठी एक theme निवडायची जेणे करून तुमचा Blog सुंदर दिसेल. Blogger मध्ये तुम्हाला अनेक theme मिळतील त्यातील कोणतीही एक तुम्ही निवडू शकता. तुम्हाला जर दुसरी एकादी premium blogger theme तुमच्या Blog ला ठेवायची असेल तर तुम्ही ठेऊ शकता. Premium theme Blog मध्ये कशी install करायची हे मी तुम्हाला पुढच्या लेखामध्ये सांगतो.


Step 6: एवढी सर्व माहिती भरल्यानंतर आता आपल्याला save वर क्लिक करायचं आहे.


आभिनंदन आपण यशस्वीरीत्या blog तयार केला.मला आशा आहे की तुम्हाला blog कसा तयार करायचा समजले असेल. मी free blogspot blog कसा बनवायचा या बद्दल सविस्तर माहिती मराठी मध्ये देऊन आपल्याला सोप्या भाषेत समजावण्याचा प्रयत्न केला आहे...

Comments