स्वागत नविन वर्षाचे

     


आज 31डिसेंबर 2020 इंग्रजी महिन्या प्रमाणे या वर्षाचा शेवटचा दिवस संपतोच आहे.

उदयाला नवीन वर्षाची म्हणजेच 2021  या  वर्षाची सुरुवात होईल, आपण सर्वजण या वर्षाचे मोठ्या उत्साहाने स्वागत करूया...

2020 हे वर्ष प्रत्येकाच् कायम स्मरणात राहील. हे वर्ष कोरोनाचे वर्ष होते. या कोरोनाने प्रत्येकाला जगायला,वागायला,रहायला,बोलायला,चालायला,व्यवहार करायला,चांगले शिकवले.

कोरोणाने प्रत्येकाला एक चांगला धडा दिला की, 

आयुष्य जगत असताना या जगतात माणूस हा पराधीन आहे."पराधीन आहे पुत्र मानवाचा " या उक्ती प्रमाणे तो परावलंबी आहे.तो निसर्गावर अवलंबून आहे.तो कितीही शिकला,सवरला तरी तो निसर्गावर मात करू शकत नाही. निसर्ग आपला गुरू आहे हे शिकला.माणूस पृथ्वीवरून चंद्रावर गेला,समुद्रावर गेला,तरी तो निसर्गावर मात करून पुढे जाऊ शकत नाही. 

यातून  एक गोष्ट शिकली पाहिजे की,प्रत्येक माणसाने प्रत्येक माणसाची माणसा प्रमाणेच वागले पाहिजे,बोलले पाहिजे,चालेल पाहिजे,माणूस सर्व काही निर्माण करू शकतो परंतु निसर्गातील गोष्टी तो स्वतः निर्माण करू शकणार नाही.आकाश ढग,  सूर्य,चंद्र,तारे,जमीन,पाणी,ही निसर्गाची आपणास मिळालेली देणं आहे.  

आपण श्रीमंत आहोत म्हणून काहीही करून चालणार नाही आणि निसर्गाला ही हे मान्य नाही. पैसा,धन,दौलत,आहे म्हणून आपल्या मस्तीत वागून चालणार नाही.

माणूस हा स्वतःबरोबरच इतरांकडून शिकत असतो.जीवन जगत असताना आपण जे चांगले ते घेतले पाहिजे.चांगल्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे.नवीन बदल हे स्वकरले पाहिजे.मी आणि माझा यातून बाहेर पडले पाहिजे.

हे जग खूप विशाल आणि सुंदर आहे.त्यातून जे चांगले आहे ते अंगीकारले पाहिजे.सर्वच गोष्टी आपल्या मना सारख्या घडत नसतात. नवीन वर्षात काही  नवीन  शिकले पाहिजे.स्वतः मध्ये काही बदल करून घेतले पाहिजे.आपले काही चुकले तर क्षमा मागायला पाहिजे आणि इतरांचे चुकले तर क्षमा करायला शिकले पाहिजे.

जीवन खूप चांगले आहे .जीवन सुंदर,सुखी,आनंदी,समाधानी करण्यासाठी माझच खरं म्हणू नाही तर जे खरं असेल ते माझं म्हणायला शिकलं पाहिजे. दुसऱ्याचे जास्त ऐकायला आणि स्वतः कमी बोलायला जमलं पाहिजे.मी आणि माझं यात गुंतून न रहाता सोडून द्यायला शिकलं पाहिजे.या पृथ्वी तलावरील प्रत्येक वस्तू आपली असून ती जपून वापरली पाहिजे. ही भावना ठेवून जागृत झाली पाहिजे.हीच तर खरी आनंदाची,सुखी जीवनाची गुरू किल्ली आहे.

आपल्या स्वतः मध्ये बदल करून समाजातील जे" का रंजले गांजले त्यासी म्हणे जो अपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेतीची जाणावा"या प्रमाणे आपल्या आई बाबा बरोबरच समाजातील  गरीब,अनाथ,वृध्द यांची सेवा करुया.

आपल्या बहिणी प्रमाणेच पर स्त्री ला आपली माता भगिनी समजून तिला मान सन्मान मिळवून देऊ या." एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ" या संत वाचन प्रमाणे  आपले आचार आणि विचार यात बदल करुया."जुने जयु द्या मरणा लागूनी जाळा किंवा पुरूनी टाका" या उक्ती प्रमाणे जुने म्हणजेच ज्या वाईट रूढी परंपरा, चालीरीती , सोडून नवीन वर्षात नवीन क्रांतिकारी विचाराने प्रेरित होऊन नवीन विचाराचा नवा वसा घेऊया.संताचे विचार आणि विज्ञानाची कास करून आपला आणि समाजाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करुया.

झाले गेले विसरून नवीन सुरुवात करुया.नवीन वर्षात काही नवीन संकल्प करूया.व्यसनमुक्त राहून व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करूया.एक मूल एक झाड,बेटी बचाव बेटी पाढव यासाठी भविष्यात प्रयत्न करूया.समाजातील वाईट परंपरा झुगारून नवीन विचाराची परंपरा स्वीकार करुया.हे विश्वची माझे घर आणि यातील प्रत्येक माणूस माझा नातलग आहे.ही भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न करुया.

सर्वांशी प्रेम,जिव्हाळा,आपुलकी,माया,ममता,माणुसकी या नात्याने वागुया.पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्ष हे सुखी, आनंदी,समृद्धीची भरभराटची जावो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद कायम राहो,अशी आशा अपेक्षा उराशी बाळगून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होऊया.अपना सर्वांना आणि आपल्या परिवारासह नातेवाईक, मित्रमंडळीला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.


Comments